गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर. . (पारोळा विभागीय संपादक सागर थोरात)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत योगशास्त्र विभागाच्या प्रथमवर्ष ,द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमांतर्गत , विद्यार्थ्यांमार्फत गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल मध्ये किशोरवयीन मुलां मुलींसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नुकतेच गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक सुनील ठाकरे , स्कूल च्या उप प्राचार्या श्रीमती ज्योती वडगावकर सह, शिक्षक वृंदांच्या हस्ते करण्यात आले. गुलाबी थंडीच्या दिवसात, सकाळी सकाळीच योग शिबिर असल्याने, किशोरवयीन मुला-मुलीं योग शिबिराचा आनंद घेत असून योगशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी सौ. देवयानी महाजन, व वैष्णवी पाटील त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.. सदर योग शिबिर एक महिना चालणार असून, योग शिबिरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इंजिनीयर प्रा.राजेश पाटील सर, प्रा.लीना चौधरी मॅडम, प्रा. गीतांजली भंगाळे मॅडम, प्रा. लिंता चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन व ग्रामीण उन्नती मंडळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सचिन भाऊ विसपुते , श्रीमती अंजुषा चव्हाण यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0