हिप्पारगा थडी येथे, दुसरा सत्यशोधक विवाह सोहळा मारोती एडकेवार जिल्हा :प्रतिनिधी नांदेड नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी येथे सत्यशोधक विवाह सोहळा, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्री माई यांनी,24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली, सत्य हेच धर्म असे बहुजनांना सांगितले, त्यांचे विचार आचरणात आणण्याच कार्य हिप्पारगा थडी येथील उच्चं शिक्षित तरुण, संदीप एडकेवार व प्रियंका रुमाले, यांनी घेतला संदीप व प्रियंका यांनी सत्यशोधक स्थापना दिवस 24 सप्टेंबर 2025 रोजी, दोघांनी एकमेकांच्या विचाराने सत्याशोधक विवाह करण्याचा निर्णय घेतला,व त्याच्या एडकेवार व रुमाले परिवाराकडून सत्यशोधक विवाह दि. 29/12/2025 रोजी 12:30 आयोजित करण्यात आला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्या,144 वर्षांनी म्हणजे दि 30 एप्रिल 2017 ला हिप्पारगा थडी येथे,पहिला सत्यशोधक विवाह पत्रकार मारोती एडकेवार व अर्चना वाघमारे यांचा झाला व आज 9 वर्षांनी हिप्पारगा थडी येथे दुसरा, सत्यशोधक विवाह एडकेवार व रुमाले परिवार करत असून,ग्रामीण भागात सत्यशोधक विचार बहुजन समाज आचरणात आणत आहेत त्यामुळे,या विवाह सोहळ्याला नांदेड जिल्हातील पत्रकार बांधव व प्राध्यापक,आंबेडकरी, सत्यशोधक, बहुजनवादी, शिक्षण प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते, यांची उपस्तिथी लाभणार असून, संदीप एडकेवार व प्रियंका रुमाले यांना शुभेच्छा देण्यासाठी दी 29/12/2025 रोज सोमवार स्थळ,महात्मा फुले नगर हिप्पारगा थडी, ता बिलोली जि नांदेड येथे. उपस्थिती राहावे हीं एडकेवार व रुमाले परिवार यांच्या कडून विनंती करण्यात आली.

हिप्पारगा थडी येथे, दुसरा सत्यशोधक विवाह सोहळा 
Previous Post Next Post