**जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मागण्याकडे दूर्लक्ष.**सामान्य कर्मचार्‍यावर उपासमारीची वेळ*. {मानवत / प्रतिनिधी.}—————————————पंचायत समिती मानवत व पाथरी अंतर्गत असलेल्या ग्राम पंचायत मध्ये कार्यरत कर्मचारी यांनी आपल्या मागण्यासाठी वारंवार त्यांच्या न्याय मागण्यासाठी अनेक वेळा उपोषणासारखे आंदोलने करून ही प्रत्येक वेळी परभणी जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या हाती गांजर दिले.तालूक्यातील ग्राम पंचायतीचे कर्मचारी यांना शासनाने त्यांच्या वाढीव किमान वेतन मधील फरकाची रक्कम परभणी जिल्हा परिषदकडे वर्ग केली होती. परंतु प्रशासनाने मनमानी करत त्यातील 55 लक्ष रु कपात केले. या कपाती विरुद्ध पंचायत समिति मानवत व पाथरी तालुक्यातील कर्मचारी यांनी दि. 01/04/2025 रोजी पंचायत समिती मानवत समोर आमरण उपोषण केले. पण असता जिल्हा परिषदेने त्यावेळी समिती स्थापन करून अहवाल मागवला होता. सदरील समितीने आपला अहवाल जिल्हा परिषदकडे 15 मे 25 रोजी सादर केला त्यात त्यांनी कपात केलेली रक्कम देणे योग्य असल्याचे नमूद केले आहे. हि समिती फक्त मानवत व पाथरी यांच्या साठीच होती. त्यानंतर हि जि.पं.णे कोणतीही कार्यवाही केली नाही.त्यामुळे पुन्हा दि.11/08/25 पासुन मालीकार्जुन मंदिर रामपुरी बु येथे आंदोलन केले असता त्यावेलोही पं.स.मानवत व जिल्हा परिषद प्रशासनाने येत्या 2 दिवसात पैसे वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते तेही लेखी स्वरुपात परंतु यावेळी ही कोणतीही कार्यवाही झाली नाही.त्यामुळे दि. 11/9/25 पासुन जिल्हा परिषद समोर आंदोलन केले असता त्या वेळी मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 2 दिवसात पैसे वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिले असता आम्ही आंदोलन करणारे त्यांना निकशून सांगितले होते कि तुम्ही बोलता ते शक्य नाही कारण तुमच्या कार्यालयातील अधिकारी हे करणारा नाहीत. परंतु त्यांनी एकवेळ माझ्यावर विश्वास ठेवा म्हणुन त्यावेळी माघार घेतेली. परंतु यावेळी हि तोंडाला पाने पुसली. म्हणुन दि. 15/10/25 पासुन प.स.मानवत समोर ऐन दिवाळीत आंदोलन केले .यावेळी प्रशासनाने खोटे पत्र देत आंदोलन मोडण्याचे ठरवले होते परंतु मागील अनुभव वरून या पत्राची खात्री आम्ही स्वतः केली असता जे आम्हाला पत्र देण्यात आले होते ते पत्र साफ खोटे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा जि.पं. णे दुसरे पत्र काढले जे कि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने परंतु या पत्रावर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. म्हणुन आम्ही ते पत्र स्वीकाराण्य्चे टाळत होतो परंतु पंचायत समितीचे मा.गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी मोबाईल वरून बोलणे करून दिले आणि पुन्हा 8 दिवसात पैसे वर्ग करण्याचे सांगितले. परंतु यावेळीही कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे शेवटचे आंदोलन आता दिनांक 05/01/ 2026 पासुन पंचायत समिती समोर आमरण उपोषण महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 शाखा मानवत तर्फे करण्यात येणार आहे.या सर्व आंदोलनाला जिल्हा परिषद मधील काही झारीतील शुक्राचार्य जबाबदार आहेत. या शुक्राचार्यांची नावेही वेळोवेळी आम्ही जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले होते. फक्त अन फक्त त्याच्या हट्टामुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर हा अन्याय होत आहे.***

जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मागण्याकडे दूर्लक्ष.**सामान्य कर्मचार्‍यावर उपासमारीची वेळ*.                                                                           
Previous Post Next Post