पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय , अनवर्दे - बुधगाव या विद्यालयातील इयत्ता सातवी या इयत्तेतील विपुल गणेश साळुंखे, वैभव गणेश साळुंखे, अविनाश शांतीलाल शिरसाट, भूपेश कैलास शिरसाट, पृथ्वीराज रामचंद्र शिरसाठ यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात हुबेहूब आकृती रेखाटन साठी रेखाटन मशीन तयार केले होते तरी त्यांची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात चौथा क्रमांक आला, तरी त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस चोपडा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व विज्ञान शिक्षण मंडळ चोपडा , तसेच नूतन ज्ञान मंदिर अडावद यांच्या संयुक्त विद्यामाने या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे विद्यालयातील उपशिक्षक श्री प्रशांत पाटील सर व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक ग्राम विकास शिक्षण मंडळ अनवर्दे- बुधगाव संस्थेचे चेअरमन श्री दादासो प्रवीण साळुंखे व्हाईस चेअरमन तात्यासो ज्ञानेश्वर बोरसे सचिव दादासो हंसराज बोरसे व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक श्री बळवंत सोनवणे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व पालकांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
byमीडीया पोलीस टाईम
-
0