अवैध शालेय वाहतुकीचा सुळसुळाट; नांदगाव खंडेस्वर ते राजुरा रोड मार्गावरील अधिकृत बस चालकांसमोर आर्थिक संकट(प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव.. (चांदूर रेल्वे | प्रतिनिधी: विपुल पाटील ). अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर ते राजुरा रॊड या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैध शालेय वाहतूक सुरू असल्याने अधिकृत बस चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात बस चालक मंगेश भीमराव गिरपुंजे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.काय आहे मुख्य अडचण?मंगेश गिरपुंजे हे शासनाचे सर्व नियम पाळून ५३ सीटर स्कूल बसद्वारे विद्यार्थ्यांची अधिकृत वाहतूक करतात. मात्र, याच मार्गावर राजुरा, टोंगालाबाद, येनस या गावांपासून नांदगाव खंडेश्वर ते राजुरा रोड वर अनेक खासगी वाहने आणि रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे.संबंधित अवैध वाहनांचे क्रमांक खालीलप्रमाणे आहेत: खासगी व्हॅन: MH-09 EK 4427 रिक्षा क्रमांक: MH-27 BW-4507, MH-27 AF-2402, MH-27 AR-2524, MH-27 BW-5464चिमुकल्यांचा जीव धोक्यातधक्कादायक बाब म्हणजे, एका छोट्या रिक्षामध्ये तब्बल २५ ते ३० चिमुकल्या विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी आरटीओ विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.प्रशासकीय उदासीनता आणि आर्थिक फटकातक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, ५ ऑगस्ट २०२४ पासून आतापर्यंत १० वेळा स्मरणपत्रे देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट, तक्रार केल्यावर संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. अवैध वाहतुकीमुळे अधिकृत बस चालकांचा व्यवसाय ठप्प झाला असून, बँकांचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे.न्यायासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावाया प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदने पाठवण्यात आली आहेत. अवैध वाहतूक तात्काळ बंद करून अधिकृत बस चालकांना न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास या मार्गावरील अधिकृत वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0