रावेर पोलिसांनी १२ तासांत लावला उतारकरु मेंढपाळाच्या सोने-चांदीच्या दागीन्यांच्या चोरीचा छडा.* (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)रावेर पोलिस स्टेशन हदीत दि. २७-०२-२०२६ रोजी मेंढपाल खंड भिका सरगर रा. ब-हाणपुर यांनी वत्सलाबाई रामदास पाटील रा. नेहता यांच्या शेतात मेंढया बसवलेल्या होत्या. नेहता शिवरात त्यांनी त्यांचा संसारपयोगी सामान, सोने चांदी चे दागीने हे बैलगाडीवर पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेले होते परंतु कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ते चोरुन नेल्याच्या तक्रारीवरुन रावेर पोलिस स्टेशन ला दि. २७/०२/२०२६ रोजी गु.रं.नं ८५/२०२६ भा. न्या. संहीता कलम 303 (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयात रावेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांनी रावेर गुन्हे शोध पथक तसेच बिट अमंलदार यांना तात्काळ सुचना दिल्या नुसार तपासाला लागलीच सुरवात करण्यात आली होती. परंतु सदर घटनास्थळ हे शेतशिवार असल्याने तेथे तांत्रिक तपासाला अडचण येत होती त्यावेळेस सदर घटनास्थळी असलेले प्रत्यक्ष साक्षीदार यांचे कडे तपास करण्यात आल्यावरुन एक महीला सदर घटनास्थळी संशयीतरित्या फिरत होती असल्याची माहीती बिट अमंलदार यांना मिळाल्यावरुन सदर महीला कोण होती? हे समजुन येत नव्हते परंतु रावेर पोलिसांना अखेर सदर महीलेची ओळख पटविण्यात यश आले. तसेच सदर महीलेला अगोदर विचारपुस केली असता ती उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने तिला विश्वासात घेवुन विचारपुस करण्यात आल्यावर सदर महीलेने गुन्हयाची कबुली देवुन तीचे कडेस असलेला चोरीचा मुद्देमाल पोलिसांना काटुन दिलेला आहेसदर संशयीत महीला हिचेकडुन ०१) १,४२,५००/- रुपये किमतीचे महीलांचे हातातील ९९५ ग्रॅम वजनाचे 03 चांदीचे कडे ०२) 30,000/- रु किमतीचे 03 ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची बाही असे संपर्ण चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर महीले वर कायदेशील कारवाई करण्यात आलेली आहे.सदर कार्यवाही ही मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो पोलिस अधिक्षक जळगांव, मा. श्री अशोक नखाते सो अप्पर पो. अधिक्षक जळगांव विभाग, मा.श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग, यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन रावेर मधील पो. नि.डॉ विशाल जयस्वाल, पो.हे. कॉ विजय चौधरी, पो.कॉ. विक्रम सिसोदे, चैतन्य नारखेडे, रुबाब तडवी गुन्हे शोध पथकातील प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, गजानन बोने यांनी केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हे. कॉ विजय चौधरी हे करीत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0