*भद्रावती तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानास प्रारंभ**महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्या - तहसीलदार राजेश भांडारकर* (महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.27 :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १)” अंतर्गत भद्रावती तालुक्यात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही पत्रकार परिषद गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय, भद्रावती येथे पार पडली.शासनाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२६ च्या अध्यादेशानुसार हे अभियान दि. ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळ अधिकारी क्षेत्रांत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा जलद निपटारा करून शासकीय सेवा सुलभ व पारदर्शक करणे हा आहे.तहसीलदार राजेश भांडारकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती देताना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शिबिरामध्ये प्रलंबित जमिनीच्या फेरफार प्रकरणांचा निपटारा, शासकीय अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, अकृषक (एनए) जमीन संदर्भातील मार्गदर्शन, तसेच गाव दप्तर अद्ययावत करण्याबाबत माहिती दिली जाणार आहे.यासोबतच ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी सेवा सुलभ करणे, ई-मोजणी प्रक्रिया गतीमान करणे, कृषी नोंदणी, तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.शिबिरात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण केले जाणार आहे. भोगवटादार वर्ग बदल, ‘जिवंत ७/१२’ मोहीम, सामाजिक व आर्थिक योजनांचा लाभ, तुकडेबंदी कायद्याअंतर्गत कामे, जमीन व्यवहार नोंदणी, शालेय दाखले, पांदण रस्ते प्रश्न आणि ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टे वाटप याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल.या पत्रकार परिषदेस सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ. बंडू आकनूरवार, नायब तहसीलदार मनोज आकनूरवार, मधुकर काळे, सुधीर खांडरे, क्षेत्र सहाय्यक (वन) विकास शिंदे, दुय्यम निबंधक झाडे, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, भूमी अभिलेख अधिकारी पारधी, देवानंद गावंडे, गट शिक्षणाधिकारी प्रकाश महाकाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी दिलीप ठेंगे, प्रा. विवेक सरपटवार, दिलीप मांढरे, शाम चटपल्लीवार, महेश निमसटकर, लिमेश माणूसमारे, निलेश नवराते, राजू गैनवार, अतुल कोल्हे, उमेश कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते.

भद्रावती तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानास प्रारंभ**महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्या - तहसीलदार राजेश भांडारकर*                                                                             
Previous Post Next Post