*बालकलाकारांच्या कला अविष्कारांने नागरजवळेकर मंत्रमूग्घ झाले.* (मानवत / प्रतिनिधी.)———————————मानवत तालूक्यातील नागरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बालकलाकारांचे वार्षिक स्नेह-संमेलन उत्साहात संपन्न झाले.मानवत तालूक्यातील नागरजवळा जिल्हा परिषद शाळेमध्ये दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायं 7 वा. जि. प. प्रा. शाळा नागरजवळा येथे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष राजेभाऊ होगे होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठशिक्षण विस्तार अधिकारी श्री पवार सर तसेच सावरगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री शिराळ सर, सरपंच श्री सुरेशराव होगे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री काळदाते सर यांची प्रमुख उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात राजमाता, माॅसाहेब जिजाऊ, छ. शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री काळदाते सर यांनी केले. प्रमुख पाहुणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार, कलेचा विकास आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गीते व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गावातील तरुणांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरीत्या केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्या बद्दल सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे कौतुक करण्यात आले. वार्षिक स्नेह संमेलनास पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्रीमती वैशाली विष्णू आणि नम्रता होगे, प्रेरणा होगे यांनी केले तर श्री माणिक आवचार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0