सिंदी रेल्वे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी नागरिक एकवटले...खासदार अमरभाऊ काळे, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्रआज सिंदी रेल्वे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी खासदार अमरभाऊ काळे, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून या आंदोलनात पाठिंबा दिला आहे.सिंदी रेल्वे परिसरातील नागरिकांनी स्वतःचा रक्ताने 1400 पेक्षा जास्त पत्र लिहुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार आहेत.सिंदीत टाळ-मृदंगाचा गजर झाला, निवेदने दिली, आश्वासने ऐकलीष्ठ पण प्रशासन हलले नाही, अखेर संतापलेल्या सिंदीकरांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. आमच्या जिवाशी खेळ थांबवा ग्रामीण रुग्णालय द्या, असा संदेश या रक्तपत्रांतून देण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व धर्म, सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्व वयोगटातील नागरिक एकदिलाने उतरले. सत्ताधाऱ्यांनी आता तरी डोळे उघडावेत. सिंदीसह लगतच्या २५ गावांचा आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तातडीने ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, अशी ठाम मागणी आहे. अन्यथा हा शांत लढा अधिक तीव्र होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिला आहे.याआंदोलनाला अमोल सोनटक्के मित्रपरिवार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नपा उपाध्यक्ष सुधाकरजी खेडकर, नगरसेवक आशिष देवतळे, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, गटनेता अजय कलोडे, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, सचिव धनराज झिलपे, बंटी बेलखोडे, युगल अवचट माजी आमदार राजू तिमांडे कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती हिंगणघाट सुधीर बाबू कोठारी यांच्यासह सिंदी रेल्वे येथील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधि मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

Previous Post Next Post