भद्रावतीत प्रदेश नेतृत्वाची भेट; चंद्रपूर जिल्हा संघासाठी अभिमानाचा क्षण... (!महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती ) भद्रावती दि.22:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या भद्रावती येथील भेटीमुळे चंद्रपूर जिल्हा संघासाठी अभिमानाचा क्षण ठरला. जिल्हा संघाच्या कार्याची दखल घेत आयोजित करण्यात आलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव, दैनिक गावकरी चे संजय फुलसुंदर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे तसेच तालुका अध्यक्ष संतोष शिवणकर उपस्थित होते. जिल्हा संघाच्या वतीने प्रदेश सरचिटणीसांचा सन्मान करण्यात आला. बैठकीदरम्यान चंद्रपूर जिल्हा संघाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. पत्रकारांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा, संघटनात्मक विस्तार आणि जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. प्रदेश नेतृत्वाने जिल्हा संघाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही संघटनेची ताकद अधिक वाढविण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे चंद्रपूर जिल्हा संघाचा आत्मविश्वास दुणावला असून, पत्रकारांच्या हक्क व सन्मानासाठीची बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

भद्रावतीत प्रदेश नेतृत्वाची भेट; चंद्रपूर जिल्हा संघासाठी अभिमानाचा क्षण...                                                                
Previous Post Next Post