रावेर तालुक्यातील आजंदे जि.प.शाळा : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद मेळाव्याचा आनंद.. (जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे)आज दिनांक २७/२/२०२६ शुक्रवार रोजी आपल्या जि प शाळा अजंदे येथे सकाळी ठीक ११.३० वाजता बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला ..तसेच दुपारी ३.३० वाजता बाल रंगोत्सव आपल्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाआहे .आजंदे येथील जिल्हा परिषद शाळेत दि.२७ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्रीमती मनीषा प्रल्हाद पाटील व शिक्षक वृंदांनीक केले. तसेच विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून आपल्या नृत्याचे सादरीकरण केले.गावातील प्रतिष्ठित नागरिक,उपस्थित पालकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर बक्षिसांचा वर्षाव केला.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य आणि गावकरी यांच्या कडून कार्यक्रमासाठी रोख बक्षिस 1140 रूपए व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या कडून 700 रूपयांचे बक्षीस देण्यात आले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री जितु भाऊ रविंद्र इंगळे, उपाध्यक्ष श्री. अनिल अरूण कोळी, ग्रामपंचायत सदस्या व शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ.लताताई दत्तात्रय सुर्यवंशी यांचे आणि इतर सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच गावातील नागरिकांचेही सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्रीमती मनिषा प्रल्हाद पाटील,उपशिक्षक श्री किरण चिंधूजी सावळे, शिक्षण सेवक श्री. विठ्ठल बबन धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले..

रावेर तालुक्यातील आजंदे जि.प.शाळा : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद मेळाव्याचा आनंद..                                                  
Previous Post Next Post