बंजारा प्रवर्ग अनुसूचित जमाती मागणी अभ्यास समिती तात्काळ रद्द करण्याची मागणी.. (मीडीया पोलीस टाईम यावल जळगाव उपविभागीय संपादक यासीन तडवी) आज दिनांक __10/03/2026_ रोजी रावेर येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने मा. तहसीलदार, तहसील कार्यालय रावेर यांच्या मार्फत मा. महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य तसेच मा. मुख्यमंत्री यांना बंजारा प्रवर्ग अनुसूचित जमाती मागणी अभ्यास समिती तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्य शासनाने स्थापन केलेली बंजारा प्रवर्ग अनुसूचित जमाती मागणी अभ्यास समिती ही राज्यातील मूळ अनुसूचित जमाती समाजाच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांवर परिणाम करणारी ठरत असून, त्यामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने आदिवासी समाजाच्या भावना व हक्कांचा आदर राखून ही समिती तात्काळ रद्द करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उत्तर महाराष्ट्र महानिरीक्षक रौनक तडवी, कुसुंबा येथील मा. सरपंच सलीम तडवी, प्रिंप्री येथील मा. सरपंच नबाब तडवी, लोहारा पि.सं. सोसायटी चेअरमन नशीर तडवी, आभोडा येथील मा. सरपंच गुलशेर तडवी, सांगवी येथील उपसरपंच फिरोज तडवी, . अमित तडवी, मोहगण येथील समाजसेवक नुरा तडवी, हंबडी येथील समाजसेवक सरदार तडवी, अहिरवाडी येथील समाजसेवक जहांगीर तडवी, भाटखेडा येथील बबिता तडवी, ग्रा.पं. सदस्य पाल सलीम तडवी, विवरा येथील ग्रा.पं. सदस्य भिकारी तडवी, कुसुंबा येथील ग्रा.पं. सदस्य गबु तडवी, चादखा तडवी, सुलेमान तडवी, सर्फराज तडवी तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.रावेर तहसील कार्यालय येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने बंजारा प्रवर्ग अनुसूचित जमाती मागणी अभ्यास समिती रद्द करण्याबाबत मा. तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देताना पदाधिकारी व कार्यकर्ते.

बंजारा प्रवर्ग अनुसूचित जमाती मागणी अभ्यास समिती तात्काळ रद्द करण्याची मागणी..                                                                         
Previous Post Next Post