फैजपूरमध्ये 117 राशन किटचे वितरण — गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद”युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र युनिट फैजपूर आणि जमाअते इस्लामी हिंद यांच्या सहकार्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही सेवा उपक्रम.. (रावेर / शेख शरीफ)पवित्र रमजान महिन्याच्या बरकतीत फैजपूर शहरात मानवता आणि बंधुभावाचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र युनिट फैजपूर आणि को-ऑपरेटिव जमाअते इस्लामी हिंद, फैजपूर यांच्या संयुक्त पुढाकाराने यंदाही गरजू कुटुंबांना 117 रमजान राशन किटचे वितरण करण्यात आले.आयोजकांच्या माहितीनुसार यावर्षी एका राशन किटची किंमत सुमारे 1200 रुपये ठेवण्यात आली होती. या किटमध्ये एका कुटुंबाला संपूर्ण महिन्यासाठी लागणाऱ्या आवश्यक अन्नधान्याचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे गरीब व गरजू कुटुंबांना रमजानचा महिना सुलभपणे पार पाडता येईल अशी व्यवस्था करण्यात आली.या सामाजिक उपक्रमासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले. काहींनी एक किट, तर काहींनी दोन ते पाच किटपर्यंत मदत करून या उपक्रमाला हातभार लावला. आयोजकांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानत समाजातील ही एकजूटच खऱ्या अर्थाने मानवतेचे प्रतीक असल्याचे सांगितले.आयोजकांनी अल्लाहकडे दुआ करत सर्व मदत करणाऱ्यांना अजर-ए-अजीम लाभो आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट व बरकत लाभो अशी प्रार्थना केली.पवित्र रमजान महिन्यात अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे केवळ गरजू कुटुंबांना मदत मिळत नाही, तर समाजात बंधुभाव, सहानुभूती आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होतो.✨ “रमजान हा केवळ इबादतीचा महिना नसून गरजूंची मदत करून मानवतेची सेवा करण्याचाही महिना आहे.”
byमीडीया पोलीस टाईम
-
0