_साहित्य क्षेत्रातील ताऱ्याचा अस्तः सुनील पाल_**साहित्यकार कवि आरिफ काजी यांचा श्रद्धांजलि सोहळा सम्पन्न*हिंगणघाट:- मानवीय संवेदनशीलतेचे सृजनशिल अभिव्यक्ती दर्शविणारी बाब जर कुठली असेल तर ती म्हणजे साहित्य क्षेत्रातला काव्य प्रकार आहे. आपल्या वाणीने व लेखणीने साहित्य क्षेत्रात आपले स्थान देशभरात निर्माण करणारे हिंगणघाट येथील कवि आरिफ काजी या तारेच्या अस्त म्हणजे साहित्य क्षेत्राची मोठी हाणी आहे, असे प्रतिपादन लाफ्टर चैलेंज विजेता हास्य अभिनेता सुनील पाल यांनी व्यक्त केले. २ मार्च रोजी साहित्य रत्न मंच व्दारा जी.बी. एम. एम. शाळेच्या सभागृहात आयोजित श्रद्धांजलि कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.श्रद्धांजली सभेच्या अधक्षस्थानी डॉ. शांतीलाल कोचर होते तर प्रमुख अतिथि म्हणून सुप्रसिद्ध साहित्यकार इमरान राही, अँड अमानी कुरेशी, प्रा. मजीद बेग मुगल, अँड उल्हास वाघ, एड. इब्राहीम बख्श आजाद, कवि मुरली लाहोटी, डॉ. रविपाल भालशंकर, 'अब्दुल कदीर बख्श, कविता बैस,मोहम्मद मकसूद बावा पत्रकार,अब्दुल कादीर शेख गिरड पत्रकार,सज्जाद बोहरा,चंगेज़ खान, मड़ावी सर,गोपाल, सागर व्यास, सोनल तिवारी,आम्रपाली पार्वे, मान्यवर प्रमुख्याने मंचावर उपस्थित होते, सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने जग संपत नाही पण हे कोणालाच समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही. आरिफ काजी यांच्या अनेक अठवनीना उजाळा देत ईमरान राही यांनी त्यांना श्रध्दांजलि दिली. या प्रसंगी एड.अमानी कुरेशी प्रा. मजीद बेग, अब्दुल कदीर बख्श, कविता बैस, मुरली लाहोटी, डॉ शांतिलाल कोचर गोल्डी, आदीनी सुध्दा श्रद्धासुमन अर्पित केले. कार्यक्रमाचे संचालन एड. इब्राहीम बख्श यांनी केले..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0