*आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेरची पहिली बैठक *रावेर (शेख शरीफ) आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेर (ता. रावेर, जि. जळगाव) यांची पहिली बैठक रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर कोळी होते.बैठकीत संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांवर तसेच आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. समाजातील युवकांना संघटित करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे तसेच समाजहितासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.या वेळी अध्यक्षमनोहर पंडीत कोळी रा.सुलवाडी उपाध्यक्षविनोद रामचंद्र कोळी(शिवा भाईG)रा.पुनखेडासचिव योगेश्वर विश्वनाथ कोळी रा. तादलवाडीसहसचिवसुभाष सुकदेव सपकाळे रा.सुनोदाखजिनदार विक्की कृष्णा कोळी रा.चोरवड कार्याध्यक्षभूषण प्रकाश तायडे रा.रावेर प्रसिद्धी प्रमुखशुभम सुनिल कोळी रा.निबोल सल्लागारअशोक रामदास कोळी रा.वाघोदाकिरण सोपान कोळी रा.अटवाडासंतोष वामन सपकाळे रा.सिगतहरीलाल रमेश कोळी रा.काडवेल गोपाळ सुधाकर कोळी रा.खिरवडप्रमुख सल्लागारविनोद रामदास कोळी रा.नेहतासदस्य संदिप तुकाराम महाले रा.निभोरा स्टेशन विजय देविदास कोळी रा.अजनाडसुपडु दोधु मोरे रा.थोरगव्हाण समाधान सदाशिव कोळी रा.पातोडीईश्वर शालीग्राम कोळी रा.चिनावलविनोद मिठाराम कोळी रा.खिडीजयराम चिंतामण कोळी रा.ऐनपुरशरद सुपडु कोळी रा.थोरगव्हाण उमेश मोहन कोळी रा.मागलवाडीज्ञानदेव पुंडलिक खवले रा. तादलवाडी यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते. : रावेर येथील श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे झालेल्या आदिवासी कोळी शिखर बहुदेशीय संस्था, रावेरच्या बैठकीप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व सदस्य.
byमीडीया पोलीस टाईम
-
0