पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरात किरकोळ वादातून पत्रकारावर लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून जीवघेणा हल्ला. पाच जणांवर गुन्हा दाखल (पंढरपुर विशेष जिल्हा प्रतिनिधी)पंढरपूर शहरातील संतपेठ परिसरात किरकोळ वादातून एका पत्रकारावर लोखंडी रॉड व कोयत्याच्या मुठीने मारहाणपंढरपूर शहरातील संतपेठ परिसरात किरकोळ वादातून एका पत्रकारावर लोखंडी रॉड व कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ४ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास संतपेठ येथील न्यू बागवान मोहल्ल्यात साई किराणा स्टोअर्ससमोर हा प्रकार घडला. फिर्यादी रफिक अब्दुलरजाक अत्तार (वय ३६ व्यवसाय – पत्रकार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ तोफीक अत्तार व जुनेद बागवान यांच्यात व्यवहाराच्या कारणावरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रफिक अत्तार यांच्यावर जुनेद अन्वर बागवान याने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून जखमी केल्याचा आरोप आहे.तसेच उमर सिंकदर बागवान याने कोयत्याच्या मुठीने पाठीत व गुडघ्यावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर मस्जित रहिमान बागवान, अमन अन्वर बागवान आणि मोहसीन मस्जिद बागवान यांनीही येऊन फिर्यादी तसेच त्यांच्या भावाला आणि वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या रफिक अत्तार यांच्यावर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0