वसुलीसाठी शहादा पालिका ॲक्शन मोडवर; थकबाकीदार चार दुकानांना सील... ( नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील) शहादा : वाढत्‍या मालमत्ता करांच्‍या थकबाकीने वैतागलेल्‍या शहादा नगर पालिकेने अखेर मार्च एंडिंगचे निमित्त साधित धडक वसुली मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. पालिकेचे अधिकारी वसुलीसाठी अचानक ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. आज (दि.11) पहिल्‍याच दिवशी मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळे भाडे थकवलेल्या गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली. यात काही व्यावसायिक गाळे सील करण्याची कारवाई केल्याने थकबाकीदार व्यावसायिकांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. पालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांना विविध कर वेळेत भरण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले होते. मात्र याला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. नियमित कर भरणा करणाऱ्या मालमत्ता धारक व गळे धारकांनी यावेळीही प्रतिसाद दिला. परंतु अन्य मालमत्ता व गळेधारकांनी या प्रतिसादाला दाद दिली नाही. शेवटी पालिका अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिल्याने सर्वच अधिकारी ऍक्शन मोडवर आल्याचे दिसलेत. आज दिवसभरात पालिकेच्‍या पथकाने टॅक्सी स्टँड संकुलातील एक गाळा, आरक्षण क्रमांक 4 संकुलातील गाळा क्रमांक 62 व आरक्षण क्रमांक 50 संकुलातील एक असे एकूण तीन गाळ्‍यांना सील ठोकले. शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या नियंत्रणाखाली वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याशिवाय मालमत्ता कर व पाणीपट्टी थकवलेल्या नागरिकांविरुद्धही कारवाई सुरू करण्यात आली असून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्‍यात येत आहेत. दरम्यान, शहरातील सर्व मालमत्ता धारक व गाळेधारकांनी करांच्‍या वसुलीची कारवाई थांबवण्‍यासाठी आपल्या थकीत व चालू वर्षातील मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळे भाडे तत्काळ नगर पालिकेच्या कार्यालयात जमा करून सहकार्य करावे. अन्यथा जप्ती व सील करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. pg

वसुलीसाठी शहादा पालिका ॲक्शन मोडवर; थकबाकीदार चार दुकानांना सील...                                                                                                        
Previous Post Next Post