जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे सुरुच असल्याने,सावदा सावदा पोलिसांकडुन आखोदेखा हाल. शेती शिवारात ९३ गांजाची झाडे जप्त; सावदा पोलिसांची धडक कारवाई.. (सावदा विशेष प्रतिनिधी )सावदा पोलीस स्टेशन हद्दीत सावदा–फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळील बैऱ्हम बुवा देवस्थान परिसरातील शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून सावदा पोलिसांनी छापा टाकून सुमारे २८ किलो ५४० ग्राम वजनाची ९३ गांजाची झाडे अंदाजीत किंमत रक्कम रुपये १ लाख ९४ हजार ७२ रुपये किमतीची जप्त केली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सावदा येथील स्वामीनारायण गुरुकुल च्या मार्गाने कोचूर रस्त्यालगत बहिरम बुवा मंदिराजवळच एका शेतात निलेश रमेश पाटील वय ४० वर्ष यांनी एक शेत खेड ने केले होते. शिवारातील शेतात गांजाची झाडे लावल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी ५ वाजे दरम्यान सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने यांच्या सह संबंधित शेतावर छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान शेतामध्ये लावलेली सुमारे ९३ गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती झाडे जप्त केली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या छाप्या प्रसंगी सावदा पोलीस स्टेशन चे सपोनी विशाल पाटील, उप निरीक्षक राहुल सानप तथा पोलीस कर्मचारी तसेच कृषी अधिकारी राजेंद्र कोंडे, नायब तहसीलदार गणेश साळी, तलाठी रशीद तडवी, फॉरेन्सिक टीम मुक्ताईनगर यांचे उपस्थित कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे सुरुच असल्याने,सावदा सावदा पोलिसांकडुन आखोदेखा हाल. शेती शिवारात ९३ गांजाची झाडे जप्त; सावदा पोलिसांची धडक कारवाई
Previous Post Next Post