श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियान**अंतर्गत बाभुळगाव मंडळात घोंगडी बैठक; महसूल सेवा बाबत नागरिकांना मार्गदर्शन* मा. संतोष येवलीकर (उपविभागीय अधिकारी, बाळापूर) व मा. डॉ. राहुल वानखेडे (तहसीलदार, पातूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियान’ अंतर्गत बाभुळगाव मंडळात घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीत नायब तहसीलदार दिनकर केंद्रे, मंडळ अधिकारी बाभुळगाव श्रीमती शेफाली देशमुख तसेच ग्राम महसूल अधिकारी वैभवी रौंदळे (बाभुळगाव) आणि अनुपमा खरतडे (हिंगणा वाडेगाव) यांनी 9 मार्च 2026 रोजी महसूल सेवा विषयक विविध बाबींवर उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच शेतकरी व नागरिकांच्या महसूल सेवेशी संबंधित अडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी लेखी अर्जही स्वीकारण्यात आले.यावेळी 14 मार्च 2026 रोजी बाभुळगाव मंडळातील बाभुळगाव येथे एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या शिबिराला उपस्थित राहून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.बैठकीदरम्यान गाव मंडळ ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची प्रसिद्धी करण्यात आली. या प्रसंगी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सेतूधारक, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य अभियान**अंतर्गत बाभुळगाव मंडळात घोंगडी बैठक; महसूल सेवा बाबत नागरिकांना मार्गदर्शन*                               
Previous Post Next Post