बोरावल येथे यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविला व्यसनमुक्तीचा जागर शैक्षणिक व्यसनमुक्ती घडामोडी. (जळगाव जिल्हा खान्देश उपसंपादक प्रवीण मेघे )दि 13 मार्च 26 शुक्रवार तालुक्यातील बोरावल येथे कला वाणिजय आणि विज्ञान महाविद्यालय यावल आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने वयसनमुक्ती जागर कार्यक्रमाचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले बोरावल खुर्द गावच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्री विठ्ठल मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधीन असलेल्या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या जळगाव जिल्हा संघटक तसेच नाशिक विभागीय संघटक प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा डॉ दयाघन एस राणे हे उपस्थित होते आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांनी व्यसनासाठी कापल्या जाणाऱ्या अमली पदार्थाचे प्रकार आणि त्याचे शरीरावर कसे दुष्परिणाम होतात हे सांगून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणारे कशा पद्धतीने समाजाची फसवणूक करतात हे उदाहरणासहित स्पष्ट केले तसेच कोणत्याही अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठीचा चार पायऱ्यांची पद्धती स्पष्ट केली या प्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेने पुरवलेल्या पोस्टर्स चे प्रदर्शन ही ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले मार्गदर्शन सत्राच्या नंतर महाविद्यालयीन तरुण तरुणींनी गटागटाने प्रत्येक घरी जाऊन अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देऊन सुखी संपन्न आणि निरामय जीवनासाठी व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या विषयावर सखोल आणि समाधानकारक माहिती मिळवल्यामुळे व्यसनाच्या संदर्भात जागृती झालेली आहे त्यामुळे आता गावातील तरुणांना, व्यसनापासून दूर राहून, स्वतःच्या विकास साध्य करता येईल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रामुख्या मार्गदर्शक प्रा डा दयाघन राणे यांचे स्वागत महाविद्यालयाच्या कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ आर डी पवार यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ आर डी पवार यांनी केले प्रा आर एस शिरसाठ सूत्रसंचालन केले तर आभार प्रा पी व्ही मोरे यांनी मानले कार्यक्रम प्रसंगी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संस्थेने उपस्थित होते

बोरावल येथे यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविला व्यसनमुक्तीचा जागर शैक्षणिक व्यसनमुक्ती घडामोडी.                                                                                        
Previous Post Next Post