*राष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन कडून जागतिक महिला दिन साजरा.*( प्रतिनिधी-विपुल पाटील) दिनांक 9/3/2026रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ओसिएशन न्यू दिल्ली वर्धा जिल्हा हा आचार्य विनोबा भावे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे.त्यांच्या या कर्मभूमीत आज राष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेआणि संपूर्ण स्त्री जातीला घटनादत्त अधिकार प्रदान करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस निमंत्रित पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.सदर कार्यक्रमास अनुपकुमार भार्गव फादर कमेटी सदस्य, अलका भुगुल बाल न्याय मंडळ सदस्या,निता उबाळे, आशा बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा,प्रतिभा वाळके ग्रामपंचायत सदस्या,संकल्प मंच अध्यक्षा,शुभांगी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या, रोहिणी बाबर विदर्भ प्रवक्ता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन, निलीमा जांभुळकर विदर्भ महासचिव, जिल्हा अध्यक्षा प्रमिला नाईक, सचिव मा.राखी दामले,यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना रोहिणी बाबर यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन ही संघटना मानव अधिकाराप्रती सजग राहून कार्य करीत असते आणि सामाजिक बाबींवर लक्ष केंद्रित करीत असते असे सांगितले.अलका भुगुल यांनी नी 0 ते18 वर्षे वयोगटातील विधिसंघर्ष ग्रस्त बालकांबाबत न्याय मंडळाची भूमिका आणि आई म्हणून आपली भूमिका काय असावी हे सांगतानाच उपस्थित किशोरवयीन मुलीनां मार्गदर्शन केले,निता उबाळे यांनी महिला म्हणून आपले अधिकार आणि त्याबद्दलची जागरूकता याबाबतची माहिती दिली.प्रतिभा वाळके यांनी महिलांनी जागतिक महिला दिन साजरा करतांना बदलाची सुरुवात ही आपल्या घरापासून केली पाहिजे असे प्रतिपादित केले.याबाबत मार्गदर्शन केले.तसेच मान्यवर पाहुण्या शुभांगी देशमुख यांनी काळानुसार स्त्रीयां मधील कालातीत बदल विषद करून समयोचित विचार मांडले.आजच्या कार्यक्रमात सुषमा वासेकर यांनी,"मी सावित्री बोलतेय"हा एकपात्री प्रयोग सादर केला.प्रमूख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलीमा जांभुळकर यांनी करतांनाच स्त्री शक्तीचा गौरव केला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनीता अलोणे यांनी केले.कार्यक्रमाला शहाराध्यक्षाधनश्री भांडेकर, दिवटे मैडम, माधुरी कांबळे, रंजना कोल्हे संजीवनी खंडारे, अलका कोहळे,जया अवघडे,माधुरी मून, अलकाताई, रंजना ताई,श्रीकांत निंबाळकर यांचीही उपस्थिती होती.

राष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन कडून जागतिक महिला दिन साजरा.*( प्रतिनिधी-विपुल पाटील)  
Previous Post Next Post