पातूर येथे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी भव्य रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न... हॉटेल ग्रँड मेहफिल येथे विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग; बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश.. (पातूर | प्रतिनिधी : ) राष्ट्रीय एकात्मता, मानवी एकता, बंधुत्व आणि समानता या उदात्त मूल्यांचा संदेश देण्यासाठी पातूर शहरात भव्य रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. पातूर येथील हॉटेल ग्रँड मेहफिल येथे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि बंधुभावाच्या वातावरणात पार पडला.या इफ्तार पार्टीचे आयोजन डॉ. साजिद शेख व मोहम्मद फरहान अमीन यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येत रोजा इफ्तार केला. यावेळी परस्पर संवाद साधत सामाजिक सलोखा, एकोप्याची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अशा कार्यक्रमांमुळे समाजात आपुलकी, परस्पर आदर आणि बंधुभाव अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त केले.या प्रसंगी प्रा. सलमान अहमद व जहूर अहमद यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृष्णा अंधारे, शंकरराव नाभरे, सुरेंद्र उगले, हिदायत खान रूम खान, हाजी सय्यद बुरहान, सय्यद मुजाहिद इकबाल, डॉ. नंदकिशोर राऊत, डॉ. अभय भुस्कुटे, पत्रकार उमेश देशमुख, मोहन जोशी, अॅड. विजय बोरकर, निर्भय पोहरे, निखिल उपरवट, अब्दुल करीम सर, डॉ. वकार अन्सारी, पत्रकार नातीक शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले तर डॉ. साजिद शेख यांनी आभार प्रदर्शन केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0