न्यायमूर्ती बदर समितीचा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अहवाल मुख्यमंत्र्यांनी देवेंदजी फडणवीस साहेब यांनी स्विकारला.. गेल्या 40 वर्षांपासून सुरु असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लढ्यातील सर्व नेते, सर्व संघटना विशेषतः अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचे प्रणेते लोकनेते मधुकरराव कांबळे साहेब आणि क्रांतिसूर्य बाबासाहेब गोपले साहेब यांच्या व आमच्या तीन हुतात्म्याच्या संघर्षाचे फलित आहे.जस्टिस अनंत बदर समितीने आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यांच्याकडे अ ब क ड वर्गीकरणाचा अहवाल सादर केला. त्याप्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अमित गोरखे, श्रीकर परदेशी(सचिव मुख्यमंत्री) प्रविण परदेशी, अश्विनी भिडे मॅडम, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब आदी उपस्थित होते.येणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला घेऊन लवकरच राज्यांमध्ये अ ब क ड वर्गीकरण लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली. सर्व उपेक्षित म्हणजे समाज मनःपूर्वक बांधवांतर्फे धन्यवाद🙏🌹आपला परिमल मधुकरराव कांबळे अध्यक्ष, राष्ट्रीय लहुशक्तीDevendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan BJP Maharashtra Madhukarrao Kamble
byमीडीया पोलीस टाईम
-
0