गॅस तुटवड्यामुळे महिला पुन्हा वळले लाकूड फाट्याकडे. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी. देगलूर) देगलूर : सध्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे,ग्रामीण भागात सुद्धा या युद्धाचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे, त्यात प्रामुख्याने गॅस तुटवड्याची परिणाम आता ग्रामीण भागात दिसू लागले,आहेत एकेकाळी सर्व महिला लाकूड व चुलीवर ती स्वयंपाक करत असे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा सन्मान करून, प्रधानमंत्री उज्वला योजना या अंतर्गत ग्रामीण भागातील, खेडोपाडी प्रत्येक घरोघरी गॅस देण्यात आले. याचा फायदा भारतातील प्रत्येक महिलांनी घेतलेला, असून आनंदाने गॅस वरती स्वयंपाक करून आपले रोजचे जीवन व कामे चालू होते, पण जगातील युद्ध पातळी अमेरिका, इराण, इस्त्रालयांमध्ये, युद्ध सुरू होऊन त्याचे परिणाम जगभर उमटायला लागले आहेत,यातच महिला भगिनींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचे तुठवडा निर्माण होऊन, ग्रामीण भागातील माय माऊली, व महिला भगिनी लाकडाकडे वळल्याचे दिसून येत आहे गॅस तुटवडा सुरळीत, होईपर्यंत चुलीवरती स्वयंपाक करण्याची ही वेळ आली असून,ग्रामीण भागात मात्र महिलांनी लाकूड फाट्याची व्यवस्था करण्याचे कामी हाती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे,जून ते सोनं असं म्हण आहे या म्हणी प्रमाणे ग्रामीण भागातील महिलांनी चुलीचे इंधन जमा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत,आहे देगलूर तालुक्यातील व्यवसायिक गॅस पुरवठा बंद झालेला असून, घरगुती गॅस साठा थोडासा शिल्लक असून अधिकृत ग्राहकाच्या मोबाईलला, ओटीपी आल्याच्या नंतरच त्यांना घरगुती गॅस देण्यात येत असल्याचे गॅस एजन्सी यांच्याकडून काळविण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0