पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. ( पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर)देगलूर राज्यातील वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या शासकीय जाहिरात दरात वाढ करण्याबरोबरच अन्य विविध महत्त्वाच्या मागण्या व्हॉईस ऑफ मीडिया / इंटरनॅशनल फोरम, देगलूर (जि. नांदेड) शाखेच्या वतीने करण्यात आल्या असून यासंदर्भात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार, देगलूर यांच्या मार्फत संक्षिप्त निवेदन सादर करण्यात आले.दि. २५ मार्च रोजी व्हाईस ऑफ मीडिया शाखा देगलूर च्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या माध्यम ातून मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनानुसार - २०१९ पासून कागद, मुद्रण साहित्य, वीज तसेच इतर खर्चात सुमारे १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, शासकीय जाहिरात दरात त्यानुसार वाढ करण्यात आलेली नाही. परिणामी, विशेषतः लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेक वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये शासकीय जाहिरात दरात किमान १५० टक्के वाढ करणे, ई-टेंडर व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, जाहिरातींसाठी किमान २०० चौ. से. आकार निश्चित करणे, तसेच जाहिरातींची देयके ३० दिवसांच्या आत अदा करणे यांचा सम वेिश आहे. विलंब झाल्यास व्याज देण्याची तरतूद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी देणे, सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्याची सक्ती करणे, प्रलंबित तपासण्या पूर्ण करून पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करणे या मागण्यांकडेही शासनाने लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे. पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती देणे तसेच २० वर्षे सेवा व ५५ वर्षे वय पूर्ण झालेल्या पत्रकारांना पेन्शनचा लाभ देण्याचीही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभअसल्याने तो आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक आहे. अन्यथा जनतेच्या माहितीच्या अधिकारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने व्यक्त केली आहे. याप्रसंगी व्हाईस मीडियाचे तालुका अध्यक्ष प्रा. निवृत्ती भागवत, सरचिटणीस शेख सब्बीर, सल्लागार गौतम बनसोडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल कदम, उपाध्यक्ष सतीश पांडवे, दिगंबर जाधव, सुलतान पटेल, प्रा. भीमराव दिपके, संतोष मनधरणे, इसाक माली पाटील, वसीम शहापूरकर, माणिक सूर्यवंशी, नागेश पलपवार आदी पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.                                                        
Previous Post Next Post