महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची नियुक्ती करण्याची शेख मगदूम यांची मागणी. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर) देगलूर महाराष्ट्रातील होणारे अत्याचार अन्याय आणि भेदभाव अजूनही थांबलेले नाहीत रोज नवे प्रकरण समोर येतात अशा परिस्थितीत महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या नेतृत्वात फक्त पदभूषण करणारे नव्हे तर लढणारे, भिडणारे, आणि निर्णय घेणारे नेतृत्व असणे काळाची गरज बनली आहे याच पार्श्वभूमीवर एक नाव भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक सौ. तृप्ती ताई देसाई ठळकपणे पुढे येते तृप्तीताई देसाई तृप्ती ताईने केवळ भाषणे दिली नाही तर रस्त्यावर उतरून लढा दिला आहे मंदिर प्रवेश आंदोलन असो किंवा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न त्या नेहमीच संघर्षाच्या आघाडीवर दिसल्या त्यांनी केवळ प्रश्न उपस्थित केला नाही तर समाजाला जाग केलं आज अशाच निर्भीड बिंदास्त आणि दबावाला न घाबरणारी नेतृत्वाची महिला आयोगाला गरज आहे समाजसेवेच्या भावनेमुळे त्या या पदासाठी योग्य उमेदवार ठरवू शकतात कृपया या विनंतीचा सकारात्मक विचार करून तृप्ती देसाई यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावे असे मगदूम भाई शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना मेलद्वारे विनंती केली आहे

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तृप्ती देसाई यांची नियुक्ती करण्याची शेख मगदूम यांची मागणी.               
Previous Post Next Post