यावल तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संताप; ४३ महिलांच्या सह्या असलेले निवेदन, आंदोलनाचा इशारा (रविंद्र आढाळे यावल उपविभागीय जिल्हा प्रतिनिधी) यावल तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येमुळे परिसरातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अजूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.स्थानिक महिलांनी दिलेल्या निवेदनावर ४३ महिलांच्या सह्या असून, या समस्येची तीव्रता अधोरेखित करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळाल्याचे महिलांचे म्हणणे आहे.परिणामी महिलांना दररोज सुमारे ५ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असून, त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित महिलांनी प्रशासनाकडे तात्काळ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, येत्या ६ एप्रिल २०२६ (सोमवार) रोजी पंचायत समिती, यावल कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, “आंदोलनाची वेळ आमच्यावर येऊ नये आणि प्रशासनाचीही नाचक्की होऊ नये, यासाठी लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय करावी,” अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.या निवेदनाची प्रत आयुक्त, जिल्हा परिषद जळगाव तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

यावल तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संताप; ४३ महिलांच्या सह्या असलेले निवेदन, आंदोलनाचा इशारा                                                                                  
Previous Post Next Post