सरपंच रहेरबर इनामदार यांच्या कडून गावातील पहिली महिला पोलीस पदी निवड झालेल्या अनुराधा आमेटवार यांचे सत्कार. (मारोती एडकेवार जिल्हा : प्रतिनिधी नांदेड ) नांदेड : महाराष्ट्रातील गृह खात्याने घेतलेल्या पोलीस भरती मध्ये प्रत्येक जिल्हामध्ये पोलीस भरती घेण्यात आली. त्या भरतीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये देखील एकूण १९९ जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये हिप्परगा थडी येथील कु. अनुराधा आबन्ना आमेटवार यांनी प्राणाची आहुती लावून जिद्द, मेहनत, चिकाटीने आपल्या कौशल्याने त्यांची नांदेड पोलीस दलामध्ये निवड झाली.या निवडीमुळे हिप्परगा गावातील पहिली शासकीय महिला नौकरी मिळवण्याचे मान त्यांना मिळाले. त्यांच्या या यशबद्दल गावातील युवा मुले व मुलींना देखील शिकणाची आवड निर्माण होईल अशी आशा गावातील नागरिक व्यक्त करत होते. गावकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून हिप्परगा थडी गावची पहिली महिला पोलीस झाल्याचा मान त्यांना मिळाला.अनुराधा अमेटवार यांना शुभेच्छा च्या भरभरून वर्षाव वेगवेगळ्या स्तरावरून होत आहेत.नातेवाईक, पत्रकार, समाजसेवक यांच्या सर्वाकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे,यातच आज हिप्परगा थडी ग्रामपंचायतचे युवा ग्रामपंचायत कडून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित ग्रामसेवक श्री हंबरे साहेब, सरपंच रहेबर इनामदार, उपसरपंच सौ चंद्राबाई तुकडे, सदस्य सय्यद एजाज,शेख गौस, शरीफाबी मोमीन, ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक लतीफ इनामदार, ग्रामपंचायत सेवक राजू अंजनीकर, सय्यद इरफान,तंगनोड गजू पाटील,चिनोड कपिल,सय्यद अलावलीसाब,मोहम्मद बेनोलेकर, तुकडे साईनाथ, तुकडे व्यंकट,पठाण मुनीर, राजू अंजनिकर, इत्यादी मंडळी उपस्थित होते.कलर - माझ्या मेहनतीच्या मागे माझा मोठा भाऊ असून त्यांनी मला परिस्थितीची कुठलीही उणीव भासू दिली नाही. त्यामागे आई बाबा देखील अफाट कष्ट आहेत. - आमेटवार अनुराधा
byमीडीया पोलीस टाईम
-
0

