यावल मध्ये धुलिवंदनाचा जल्लोष आमदार अमोल जावडे तरुणासोबत रंगले नृत्यातमहाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा खानदेश उपसंपादक प्रवीण मेघे शहरात धुलीवंदनाचा सण यदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला शहरातील द बेस्ट फ्रेंड्स ग्रुप आणि आर के फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू सम्राट मॉल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धुलिवंदन कार्यक्रमाला नागरिकांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रंगाची उधळण डीजेच्या तालावर नृत्य आणि आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला दरवर्षीप्रमाणे यदाही हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला कार्यक्रम स्थळी डीजेच्या तालावर युवक आणि बालमित्र मंडळ उत्साहाने नाचताना दिसत होते रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकावर रंग उधळत सर्वांनी जल्लोषात सहभाग घेतला परिसरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाला यावल रावेर विधान सभा मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी जवळपास एक तास तरुणासोबत धुलिवंदनाचा आनंद लुटला उत्साहाच्या भरात आमदार अमोल जावडे यांनीही डीजेच्या तालावर तरुणांसोबत नृत्य करत कार्यक्रमात रंगत आणली यावेळी उपस्थित युवकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढत आनंद व्यक्त केला या कार्यक्रमासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले होते कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे डॉ कुंदन फेगडे नगरसेवक उमेश फेगडे बाळासाहेब फेगडे योगेश चौधरी माझी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते आकाश चोपडे रुबाब तडवी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तालुकाध्यक्ष प्रा मुकेश येवले रोशन येवले डॉ धीरज चौधरी खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन अतुल दादा भालेराव गणेश महाजन भूषण फेगडे रितेश बारी उज्ज्वल कानडे चेतन आढळकर सरपंच परिषदेचे संदीप भैय्या सोनवणे विलास चौधरी चेतन फेगडे प्रशांत रणधीरे अभय शेठ जंगले आशिष पाटील दिलीप वाणी समाधान राजपूत संजय फेगडे गणेश येवले जुगल पाटील रमेश जोगी मयूर कानडे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित यासाठी गोड दुधातील बासुंदीची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी एकत्र येऊन बासुंदीचा आ संवाद घेत धुलिवंदनाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या आणि उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली
byमीडीया पोलीस टाईम
-
0