माता रमाई एकपात्री नाटकाला पंचक्रोशतील नागरिकांची तोबा गर्दी. (पिंजारी महेमुद तालुका प्रतिनिधी. देगलूर )देगलूर : शहरात दिनांक एक मार्च २०२६ रोजी माता रमाई जयंतीच्या निमित्ताने मी राजगृहातील रमाई बोलते हे एक पात्री नाटक पुणे येथील प्रा. रमणी बबीता यांनी अत्यंत सुंदररीत्या आणि तेवढ्याच जबरदस्त ताकतीने कलाकृती सादर केली आणि देगलूरकरांची मने जिंकली या कार्यक्रमाला सर्व जाती-धर्माचे लोक ,” रमाई मी राजगृहातील बोलते हा एकपात्री नाटक पाहण्यासाठी माता रमाईची भूमिका आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात रमाईंनी केलेले योगदान हे प्रत्यक्ष नाट्यरूपाच्या माध्यमातून पाहण्यासाठी अनेकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. जवळजवळ कार्यक्रम दोन तास सुरू झाला या दोन तासांमध्ये कुठल्याही प्रकारचे कोणीही हालचाल न करता अत्यंत गंभीरपणे या एकपात्री नाटकाचा आनंद घेतला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी कार्यक्रमाला भरभरून सहकार्य केल्याबद्दल सर्व देगलूर शहरातील मदत करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे व मित्रपरिवारांची मनापासून भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूर च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

माता रमाई एकपात्री नाटकाला  पंचक्रोशतील नागरिकांची तोबा गर्दी.                                                                       
Previous Post Next Post