पी.एम.श्री जि.प.प्रशाळेला पालकमंत्री मेघना दिदी यांनी दिली भेट* (*मानवत { अनिल चव्हाण }*——————————मानवत तालुक्यातील पी.एम.श्री. ( PM_SHRI ) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथे भेट दिली.यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे मॅडम, गटविकास अधिकारी मा. शिवाजीराव कांबळे, मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी मा. मंगेशजी नरवाडे, सेलू पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख व शिक्षणविस्तार अधिकारी मा. पवार सर या प्रसंगी उपस्थित होते.यावेळी शाळेच्या आवारात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील कुतूहल, शिक्षकांच्या चेहऱ्यावरची बांधिलकी आणि पालकांच्या अपेक्षा स्पष्ट जाणवत होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री यांनी त्यांच्या स्वप्नांची उंच भरारी ऐकायला मिळाली. पालकांशी बोलताना शिक्षणा विषयीची जागरूकता दिसली. शिक्षकांशी चर्चा करताना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती मिळाली. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचा गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षण जिल्हा परिषद च्या शाळांमधून मिळत असल्याचे प्रतिपादित केले. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण सादर केले. शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ यांनी प्रास्ताविक केले. माझी मुख्यमंत्री सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 मध्ये पी.एम.श्री. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत या शाळेने छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वप्रथम क्रमांक पटकावल्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा म्हणून आपल्या परभणी जिल्ह्याचा मान सन्मान विभागातच नव्हे तर संपूर्ण राज्यात झाल्यामुळे पालक मंत्री यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, माता पालक संघ आणि मानवत येथील शिक्षण प्रेमी नागरिक तसेच या शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले. मानवत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. मंगेशजी नरवाडे यांनी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये चालत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांची आणि प्रगतीची माहिती दिली. या शाळेतील एन एम एम एस, होमी भाभा बाल वैज्ञानिक संशोधन, विज्ञान प्रयोगशाळा, परसबाग आणि सुसज्ज भविष्यवेधी संगणक प्रशिक्षण लॅब याविषयी सविस्तर माहिती दिली. माननीय नामदार मेघना दीदी यांनी विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधत भविष्यवेधी आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी मानवत तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मा. परमेश्वर निर्वळ, मा. कृष्णा शिंदे, नवनिर्वाचित नगरसेवक मा. शैलेश कत्रुवार यांच्यासह मानवत येथील शिक्षण प्रेमी नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0