धारदार तलवारीसह फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर )देगलूर : कुंडलवाडी शहरात दहशत पसरवण्याच्या किंवा एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या इराद्याने धारदार तलवार बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला कुंडलवाडी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि. ४ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजताच्या सुमारास बसस्थानक परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात करण्यात आली. हर्ष उर्फ हर्षसिंग हाणमंत इंगळे (वय १९ वर्ष, रा. इंदिरा नगर, गल्ली क्र. १२, तरोडा बुद्रुक, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हर्ष हा कुंडलवाडीतील महालक्ष्मी मंदिर परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती कुंडलवाडी पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेले ३१ इंच लांबी आणि २७ इंच मूठ असलेली एक धारदार तलवार मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी ६,५००/- रुपये किमतीची तलवार आणि १०,०००/-रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ आणि २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुंडलवाडी पोलीस करीत आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

