*कारागृह लिपीक तांत्रिक कर्मचारी संघटनेचे अधिवेशनास उपस्थित रहा**@)> प्रमोद तारे.*. (मानवत / अनिल चव्हाण)——————————— कारागृह लिपीक तांत्रिक कर्मचारी संघटनेचे १ ले अधिवेशन दिनांक ४ एप्रील २०२६ रोजी भारतरत्न सर विश्वेश्वरया सभागृह, सिंचन भवन, मंगळवारपेठ पुणे येथे सकाळी १०.०० वाजता आयोजित केले असून सदर अधिवेशनास मा. डॉ. श्री. भुषण कुमार उपाध्याय, पोलीस महासंचालक (सेवानिवृत्त) होम गार्डस आणि नागरी संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई, मा श्रीमती स्वाती साठे सेवानिवृत्त विशेष कारागृह महानिरीक्षक आणि मा.श्री. विश्वास काटकर सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी संघटना मुंबई आणि मा. श्री. अशोक दगडे अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी संघटना मुंबई हे मान्यवर उपस्थित राहणार आहेततरी सदर अधिवेशनास आपल्या वर्तमानपत्रास प्रसिध्दी देउन उपस्थित राहण्याचे आवाहनसरचिटणीस वसंत सपकाळ, परभणी उमेश देशमूख, प्रमोद तारे,जुनेद शेख यांनी केले आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0

