ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात एच पी व्ही लसीकरणाचे उद्घाटन* (ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल )ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने मोफत उपलब्ध करून दिलेल्या एच पी व्ही लसीचा दि. २८/०३/२०२६ रोजी शुभारंभ करुन १८ मुलींना लसीकरण करण्यात आले सविस्तर वृत्त असे की गर्भाशय मुख कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी वय वर्ष १४ ते १५ आतील मुलींना गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक लस शासनाने मोफत उपलब्ध करून दिली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन परदेशी व डॉ प्रदीप लासूरकर यांच्या उपस्थितीत दि.२८ मार्च रोजी एच पी व्ही लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले १८ लाभार्थी मुलींना लसीकरण करण्यात आले यावेळी अफवांना बळी न पडता आपल्या मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी मुलींना एच पी व्ही लसीकरण करून घ्यावे असे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन परदेशी व डॉ प्रदीप लासूरकर यांनी सांगितले उद्घाटन प्रसंगी ऐनपुर ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0

