येरगी येथे आरोग्य शिबिरात २९८ लोकांची मोफत तपासणी.२७ जणांची मोतीबिंदू साठी तर ११ जणांची हर्निया व अपेंडिक्स शस्त्रक्रियेसाठी निवड. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर )देगलूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुक्यातील चालुक्यकालीन येरगी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण २९८ जणांची मोफत तपासणी करण्यात येऊन यामधून २७जणांची मोतीबिंदू साठी तर हर्निया व अपेंडिक्स साठी एकूण ११ जणांची निवड करण्यात आली आहे. सदरील शिबिराचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संजय लाडके सर, यांच्या हस्ते सरस्वती मातेच पूजनाने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संतोष पाटील येरगीकर, उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णालयचे डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. प्रतिक जाधव, डॉ. संजय इंगळे, आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर नेत्र विभाग, अन्य विभागांची निर्मिती करण्यात आली होती. यामध्ये नेत्र रोग तपासणी कक्ष, जनरल तपासणी कक्ष, बि.पी. शुगर तपासणी कक्ष, औषध वाटप कक्ष, बीपी तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी, स्त्री रोग विभाग, नुसार रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आले.सदरील शिबिरात एकूण २९८ महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली. उदगीर येथील लायन्स नेत्र रुग्णलयाकडून नेत्र तपासणी करून त्यामधून एकूण २७ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात येऊन उदगीर येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. तसेच यापैकी ११ जणांची हर्निया व अपेंडिक्स साठीच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आले असून त्यांच्यावर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.सदरील निशुल्क आरोग्य शिबीरात डॉ. शेख शाहनवाज, डॉ. फारूखी मॅडम, डॉ. किरण ठाकरे मॅडम, राजेश्वर मटंगे, विनायक पाटील, श्रीमती शेख शरीफा, आशाताई कालिंगवार व भुरळे, आदींनी नागरिकांची तपासणी करून नागरिकांना सेवा दिली. या प्रसंगी तंटामुक्त अध्यक्ष सायलु कांबळे, ग्रामपंचायत सदस्यविश्वनाथ बागेवार, अशोक बरसमवार, सुरेश सोमवार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे, माजी सरपंच चांदु कांबळे, दशरथ काबळे, अंगणवाडीचे हाणमाबाई बरसमवार, गंगामणी दारलावार, शितल मटपती, नागमणी बरसमवार, मजुळा सिलमकुटवार, बालिका पंचायत राज चे ग्रामपंचायत सदस्य महादेव कुंचगे, मोनिका माळगे, रुक्मिणी भुख्ळे, रितिका चिटकुलवार, शिबीर यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील, इरवंत कालिंगवार, माधव ईज्जरवार, मल्लिकार्जुन मटपती, प्रभाकर वाघमारे, माधव बागेवार, सर्व ग्राम पंचायत सदस्य, बालिका पंचायत राज, आरोग्य कर्मचारी आणि गावकऱ्यांनी परिश्रम केले. प्रास्ताविक संतोष पाटील येरगीकर यांनी केल आभार बालिका पंचायत राजचे रुक्मिणी भुरळे, सूत्रसंचालन मोनिका माळगे यांनी केल.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

