रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी.. (प्रतिनिधी फैजपूर }रावेर व फैजपूर येथे रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आलेल्या कथित भडकाऊ भाषणामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाल्याचा आरोप समोर आला असून, या प्रकरणी जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या व कौमी एकता फाउंडेशन चा वतीने पोलिस प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारीनुसार, संबंधित कार्यक्रमात काही वक्त्यांनी समाजात वैमनस्य आणि द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या संदर्भात रावेर व फैजपूर पोलिस स्टेशन तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार सादर करण्यात आली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत भारतीय कायद्यांतील विविध कलमांचा उल्लेख करून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करत, अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून (सुओ मोटू) गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, तक्रारदारांनी व्हायरल व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून, पोलिस प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना फारुख शेख जळगाव शेख कुरबान फैजपूर कलीम मेमबर रियाज मेमबर शेख फारुख अब्दुला वसीम जनाब अ रजजक भाई अवेस भांजा असीफ मेकॅनिकल अखतर पहेलवान सुलतान चाईनीज जफर अली अमीन शेख अनीस शा ह ताहेर शेख जळगाव अड साब रावेर. तसेच असंख्य मुस्लिम युवक उपस्थित होते

रामनवमी निमित्त आयोजित कार्यक्रमात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी..                                                                                     
Previous Post Next Post