बोरी व चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन होणार*

*बोरी व चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन होणार*

 *@)> पालकमंत्री मेघना बोर्डीकर*

*प्रतिनिधी { अनिल चव्हाण }
*———————————*

जिंतूर तालुक्यातील बोरी येथे पहिल्या टप्प्यात तर चारठाणा येथे दुसऱ्या टप्प्यात अप्पर तहसील कार्यालयाची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती परभणी जिल्हाच्या  पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली. 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
​बोरी येथील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी बुधवारी (दि. १५) पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेतली. 
यावेळी शिष्टमंडळाशी संवाद साधताना त्यांनी बोरी येथे लवकरच अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणार असल्याचे सांगितले. 
तसेच चारठाणा येथेही दुसऱ्या टप्प्यात अशाच प्रकारे कार्यालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विधान सभा प्रमुख डॉ. पंडितराव दराडे, नगर सेवक शेख अथर, विलास भंडारे आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासना नंतर बोरीच्या शिष्टमंडळाने टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.
​शिष्टमंडळात यांचा होता समावेश:
या शिष्टमंडळात सतीश चौधरी, आत्माराम पवार, संतोष चौधरी, डॉ. सुरेश खापरे, ओमकार चौधरी, यमाजी ईप्पर, गजानन चौधरी, विठ्ठल शिंदे, ॲड. सुरेश चौधरी (वकील संघ), डॉ. किरण बकान, डॉ. भगवान ढगे, डॉ. केशव जावळे, अनुप गोरे, भास्कर टाक, भारत जोशी, लोभान खसाब, पाशा कुरेशी, रहीम पठाण, रामा चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड, प्रसाद गोरे, उत्तम डोंबे, सुनील झंवर, विकास काळे, गोपाळ बिर्ला, प्रकाश देशमुख, नाना घोरपडे, केशव टाक, डोंबे आदींचा समावेश होता. दरम्यान, पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बोरी व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


***
Previous Post Next Post