विकासाचा रथ अखंड धावत राहणार !**@) विकासपूरूष डाॅ. अकूंश लाड*. (मानवत / अनिल चव्हाण)———————————“विकासाची गती कायम ठेवत आश्वासन पूर्ण!”*उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते भगतसिंग नगरमध्ये मारुती मंदिर व भव्य उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले.शहराच्या सर्वांगीन विकासाला वेग देत दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची परंपरा कायम ठेवत उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १ मधील भगतसिंग नगर येथे हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर मारुती (हनुमान) मंदिर व भव्य उद्यानाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या दीर्घ काळच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले आहे.भगतसिंग नगरमधील मंदिर व उद्यान उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत डॉ. अंकुशराव लाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले.या कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक राजकुमार खरात व राजेश वासुंबे यांच्यासह संजयजी बांगड, दत्तप्रसादजी बांगड, ॲड. अनिरुद्ध पांडे, मोहनराव लाड, दत्तराव चौधरी, किशोर लाड, विनोद रहाटे, ॲड. गणेश मोरे, स्वप्नील शिंदे, गणेश वासुंबे, सत्यशिल धबडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांच्या स्वप्नांना मिळाले प्रत्यक्ष रूपया ठिकाणी उभारण्यात येणारे मारुती मंदिर हे धार्मिक श्रद्धेचे केंद्र ठरणार असून, सोबतच विकसित होणारे भव्य उद्यान परिसरात हरित वातावरण निर्माण करून नागरिकांना विरंगुळ्याचे आधुनिक ठिकाण उपलब्ध करून देणार आहे. डॉ. अकूंशराव लाड यांच्या पुढाकारामुळे हा संपूर्ण परिसर विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पुढील विकासकामांची ठोस घोषणायावेळी नागरिकांशी संवाद साधताना डॉ. अंकुश लाड यांनी स्पष्ट केले की,भगतसिंग नगरला मुख्य रस्त्याशी जोडणारा डी.पी. प्लॅनमधील रस्ता लवकरच पूर्ण केला जाणार आहे. तसेच या भागातील दुसऱ्या ओपन स्पेसमध्ये बुद्ध विहार व आणखी एक उद्यान उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही”नागरिकांच्या सत्काराला उत्तर देताना डॉ. लाड म्हणाले,“शहराच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. निवडणुकीत दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. जनतेने दिलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणा आहे. काम करत आलोय, आणि पुढेही काम करत राहणार आहे.” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला राम कष्टे, सतीश मगर, नितीन मगर, नारायण गिरी, मुंजा कदम, मौली कदम, दत्ता बंडेवाड, भरत ढाले, प्रकाश ढाले, अशोक ढाले, असद खान, वाजेद शेख, समाधान साळवे, अमोल मगर, राजू चव्हाण, नितीन घनसावंत, प्रवीण मगर, विष्णू हरणे, नामदेव खताळे, गजानन बंडेवाड, रत्नदीप बोराडे, बाबासाहेब बोराडे, सुलतान भाई कुरेशी, श्रवण गायकवाड, सोनू अवचार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, डॉ. अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग नगरमध्ये सुरू झालेला हा प्रकल्प केवळ एक विकासकाम नसून, नागरिकांच्या विश्वासाची पूर्तता आणि शहराच्या प्रगतीची नवी दिशा ठरत आहे.***

विकासाचा रथ अखंड धावत राहणार !**@) विकासपूरूष डाॅ. अकूंश लाड*.                                                                             
Previous Post Next Post