*सौ.रामकंवर द्बारकादास लड्डा विद्यालया मध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेसंदर्भात महत्वाची बैठक संपन्न.*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक { अनिल चव्हाण }
———————————
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित केले जाणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीच्या परीक्षेच्या पूर्व नियोजना च्या दृष्टीने केंद्र संचालक ,उपसंचालक यांच्या उपस्थितीमध्ये पर्यवेक्षक यांच्या समवेत बैठक आयोजन करण्यात आली होते.
यावेळी सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालय मानवत केंद्रसंचालक श्री विश्वभूषण इंगोले यांनी पर्यवेक्षकांची जिम्मेदारी व कर्तव्य याविषयी संपूर्ण माहिती देत परीक्षा सुरळीत व शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी सूचना देऊन मार्गदर्शन केले. यावेळी, पर्यवेक्षक श्री विलास शिंदे, सौ रामकंवर द्वारकादास लड्डा इंग्रजी स्कूलचे मुख्याध्यापक श्री रामदास राऊत ,उपकेंद्र संचालक श्री दत्तराव शिंदे , आई इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अभिलाषा ठाकूर यांच्या सह पर्यवेक्षक लिपिक, सेवक आदींची यावेळी उपस्थिती होती.
___

