नांदेड येथे वंचित कडून शिवाजी कोण होता,या पुस्तकाचं सामूहिकरीत्या वाचन.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिखित असलेला शिवाजी कोण होता
या पुस्तकाचे सामूहिक वाचन करावे असे आव्हान, आदेश श्रद्धेय नेते अँड. बाळासाहेब आंबेडकरांच्यावतीने करण्यात आलेला आहे.
तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये शिवाजी कोण होता? या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं तेव्हा जिल्हा पदाधिकारी, महानगर पदाधिकारी, सम्यक विद्यार्थी आंदोलन सर्व पदाधिकारी, युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी-माजी व सक्रिय कार्यकर्त्यांनी या सामूहिक वाचनामध्ये पुस्तक प्रेमी, लेखक व वाचक या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. आणि सामूहिक वाचन आंदोलन यशस्वी करण्यात आलं.
दिनांक:25 एप्रिल 2026दु. 1:00 वाजता महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, आय.टी.आय. परिसरामध्ये मोठ्या आवाजात निषेध व्यक्त करून, शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा आणि खालच्या पातळीवर जाऊन प्रकाशकाची शिवीगाळ करून अपमानित केले या प्रकरणाच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनामध्ये नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज आटकोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ता कैलास वाघमारे, नांदेड दक्षिण जिल्हा महासचिव रवि भाऊ पंडित, जिल्हा संघटक संजय टिके, प्रसिद्धीप्रमुख दीपक कसबे, जिल्हा सल्लागार अँड.जयपाल ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम दादा वाढवे, सभापती बालाजी सूर्यतळे, गणपत सवयी सोनकांबळे, भीमराव बेंद्रीकर, गौतम डुमणे, पंढरी अहंकारे. यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

