यावल बस स्थानकावर सीसीटीव्ही नसल्यामुळे चोरांची वाढती हिम्मत, यावल बसस्थानकातच महिलेची सोन्याची पोत लांबवली, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांचा हात साफ ,प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण .
(यावल शकील तडवी ,जिल्हा विभागीय प्रतिनिधी)
यावल बसस्थानक परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दहिगाव येथील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी जितेंद्र पाटील (वय ३०, रा. दहिगाव) या यावल बसस्थानकात बसल्या असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोतमधील दोन पेंडल चोरी केले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. घटना लक्षात ن येताच महिलेने तात्काळ यावल पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी नागरिकांना प्रवासादरम्यान मौल्यवान दागिने व वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत भामटे चोरीचे प्रकार करीत असल्याने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यावल बसस्थानकात यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, सीसीटीव्ही यावं लागाऱ्यांमध्ये नसल्याने चोरांच्या वाढत्या हिमतीमुळे महिला धोका मध्ये प्रवाशांवर कधी काय चोरीला जाईल या भीतीने प्रवास करत आहे या गोष्टीवर यावं लागाराने लक्ष द्यावे व सीसीटीव्ही लवकरात लवकर बसवण्यात यावे अशी मागणी प्रवासी करत आहे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे

