जादूटोण्याच्या संशयातून ६५ वर्षीय वृद्धाची भरदिवसा घरात घुसून निर्घृण हत्या!बाळापूर पोलिसांची जलद कारवाई; आरोपी अवघ्या काही तासांत गजाआड*

*जादूटोण्याच्या संशयातून ६५ वर्षीय वृद्धाची भरदिवसा घरात घुसून निर्घृण हत्या!बाळापूर पोलिसांची जलद कारवाई; आरोपी अवघ्या काही तासांत गजाआड*

अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान 

 बाळापूर: (अकोला) :जादूटोण्याच्या संशयातून एका ६५ वर्षीय वृद्धाची भरदिवसा घरात घुसून लाकडी दांडक्याने ठेचून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना बाळापूर तालुक्यातील व्याळा पेठ येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात हरिदास पांडुरंग वानरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून पोलिसांनी सतर्कता दाखवत आरोपीला काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.पत्नीच्या आजारपणाचा संशयमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सुधाकर गाडगे याच्या मनात मृत हरिदास यांच्याविरुद्ध तीव्र संशय होता. "तुझ्या जादूटोण्यामुळेच माझ्या पत्नीचे आरोग्य बिघडले असून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे," असा आरोप आरोपी वारंवार करत होता. याच अंधश्रद्धेच्या वादातून १३ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपीने हातात लाकडी दांडके घेऊन हरिदास वानरे यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला.डोक्यावर गंभीर प्रहारघरात घुसताच आरोपी गाडगे याने हरिदास यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने लाकडी दांडक्याने हरिदास यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने हरिदास वानरे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.गुन्हा दाखल, आरोपी गजाआडया घटनेनंतर मृत हरिदास यांच्या पत्नी रुख्मिना वानरे (वय ६० वर्षे) यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३(१)(३) आणि ३३३ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने वेगाने चक्रे फिरवून फरार आरोपी सुधाकर गाडगे याला अवघ्या काही तासांतच ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. *मीडिया पोलिस टाईम अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*
Previous Post Next Post