मांजरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या, 23 वर्षीय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू.

मांजरा नदीत पोहण्यासाठी  गेलेल्या, 23 वर्षीय  विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील, 23 वर्षीय विवेक शंकर महाजन यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे,उन्हाळ्याच्या त्रिवतेमुळे मुळे मित्रासोबत पोहण्यासाठी येसगी येथील, मांजरा नदीत गेलेल्या या विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचे वय हे 23 असून विवेक शंकर महाजन असे त्यांचे नाव आहे ते राहणार हिप्परगा थडी,तालुका बिलोली येथील रहिवासी आहे मिळालेल्या, माहितीनुसार विवेक हा येसगी मांजरा नदी परिसरातील आपल्या मित्रासोबत,उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने,तो अचानक पाण्यात बुडाला स्थानिक नागरिकाच्या,मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता प्राथमिक, माहितीनुसार पाण्यात शेवाळ असल्यामुळे पाय घसरून तो खोल पाण्यात गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असून घटनेनंतर, विवेक महाजन यास तातडीने बिलोली येथील उपजिल्हा  रुग्णालय येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी  तपासणीअंती  त्याला मृत  घोषित केले. या घटनेमुळे हिप्पारगा थडी येथे महाजन परिवार व सर्व गावकऱ्यावरती शोकाकळा पसरली, असून विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेमुळे सगरोळी परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त केला जात आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया स्थानिक  प्रशासनाच्या, मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Previous Post Next Post