यावल तालुक्यात पॉलिश गॅंग ' सक्रिय... विरोदा येथील अनेक महिलांना घातला गंडा

यावल तालुक्यात पॉलिश गॅंग ' सक्रिय... विरोदा येथील अनेक महिलांना घातला गंडा 

विरोदा सतीश बऱ्हाटे ( तालुका विशेष प्रतिनिधी)

विरोदा - सतीश बऱ्हाटे (ता.9/5/2026) दागिन्यांना तसेच तांब्याचे भांडे पॉलिश करून चमकवण्याचा दावा करणारी 'पॉलिश गॅंग 'तालुक्यात सक्रिय झाली आहे 
विरोदा येथे दोन दिवसाअगोदर अज्ञात पाच ते सहा महिला रिक्षाने सकाळी नऊ ते दहा च्या सुमारास गावात येऊन  अनेक महिलांना फसवल्याची घटना घडली आहे दि.7/6/2026 बुधवार रोजी गावात आलेल्या  महिला गल्ली गल्लीत जाऊन जवळ असलेले पॉलिश केलेले तांब्याचे, पितळाचे भांडे तसेच सोन्या-चांदीचे दागिने दाखवत महिलांना विश्वासात घेऊन, आम्ही तुमचे भांडे पण असे 10 ते 20 रुपयांमध्ये पॉलिश करून देतो व आम्ही  पिंपरुळ फाट्यावरती बसलेले आहोत असे सांगून  बऱ्याच महिलांचे तांब्यांचे तसेच पितळाचे भांडे घेऊन गेले व उद्या पॉलिश करून आणून देतो सांगितलं परंतु पिंपरुळ फाट्यावरती अश्या कोणत्याही महिला नसल्याचे समजले तसेच दोन दिवस उलटून सुद्धा सदर महिलांनी कोणत्याही वस्तू परत आणून दिल्या नाही व  भांडे घेऊन पसार झाल्याचे समजले

नागरिकांसाठी सावधानतेचा इशारा:
1)अनोळखी महिलांना किंवा व्यक्तींना आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने पॉलिश करण्यासाठी देऊ नका.
2)घरच्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करू नका.
3)घरात एकटे असताना अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळा.असा प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा।
Previous Post Next Post