जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले.दारुचा अवैध धंद्यांचा महापुर आल्यासारखी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता,जिल्ह्याच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा..

जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले.दारुचा अवैध धंद्यांचा महापुर आल्यासारखी स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता,जिल्ह्याच्या जनतेमध्ये जोरदार चर्चा..
 

जळगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर 

जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवैध धंदे बोकाळले आहेत.या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.गुन्हेगारीची पहिली पायरी ची सुरुवात..ही अवैध धंद्यांपासुनच सुरू होते हे पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे परंतु त्या अवैध धंद्यांना बंद कोण करणार?हा प्रश्न मात्र आजपर्यंत गुलदस्त्यातच राहिला आहे..कारण अवैध धंदे बंद झाले तर वरकमाई कशी होईल म्हणून जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अवैध धंदे चांगलेच बोकाळले असल्याचे जिल्ह्यातील जनतेकडुन बोलले जात आहे..तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी परिस्थिती असल्याकारणाने अवैध धंद्ये कोण बंद करणार असा सवाल जळगाव जिल्हा च्या जनतेने उपस्थित केला आहे.अवैध धंद्यांमध्ये व्यसनाधिन झालेल्यांना आणखी कित्येक वेळा उद्धवस्त करणार ?अशी चर्चा देखील जळगाव जिल्ह्यात वाऱ्या सारखी पसरू लागली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडतील तेव्हाच पोलीस प्रशासनाला जाग येईल का ?असेही जनतेकडून ऐकवण्यास मिळत आहे.तरी संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांनी ह्या सर्व प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ अवैध बंद करावेत जेणे करुन तरूणपीढी दारुच्या व्यसनातुन मुक्त होईल आणि त्यांचे जीवन तरी वाचेल..याकडे लक्ष देत तात्काळ अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील जनतेकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे
Previous Post Next Post