राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर*
नाशिक परिक्षेत्राला नवे विशेष महानिरीक्षक: चाळीसगाव
ASP पदी अशोक नखाते, कविता नेरकर मुंबईत बदली.
*जळगाव जिल्हा संपादक अमितकुमार तडवी*
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा (खझड) तसेच राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. संबंधित आदेश शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक व नवी मुंबई येथील पोलीस उपआयुक्त स्तरावरील अनेक अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
आयपीएस अधिकारी प्रवीण मुंढे व मोक्षदा पाटील यांना पदोन्नती देत बृहन्मुंबईत अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चाळीसगाव येथे अपर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते यांची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यमान अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची बदली बृहन्मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी करण्यात आली आहे.
इतर बदल्यांमध्ये फोर्स वनचे पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांची दहशतवाद विरोधी पथक (अढड), मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून विजय खरात यांची नियुक्ती झाली असून, विशाल गायकवाड यांना पुणे लोहमार्ग अपर पोलीस अधीक्षकपदी जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागात (डखऊ) उज्ज्वला वानकर, रमेश चोपडे व वैशाली शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. तसेच पुण्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, काही अधिकाऱ्यांना मुदतवाढही देण्यात आली आहे. ठाणे येथील उपायुक्त सचिन गोरे व नागपूर येथील उपायुक्त राहुल मदने यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
हे सर्व फेरबदल प्रशासकीय गरज व पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार करण्यात आल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

