आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना (IHRPDA) ची बैठक संपन्न; सामाजिक कार्याला गती देण्याचा संकल्प*

*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना (IHRPDA) ची बैठक संपन्न; सामाजिक कार्याला गती देण्याचा संकल्प*

अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान 

 अकोला.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटना (IHRPDA) च्या वतीने अकोला येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि सक्रिय सदस्यांनी उपस्थित राहून आगामी सामाजिक योजनांवर सविस्तर चर्चा केली.बैठकीदरम्यान मानवाधिकार संरक्षण, शिक्षणाचा प्रसार आणि गरजूंना मदत करणे यांसारख्या गंभीर विषयांवर ठोस रणनीती आखण्यात आली. "वर्तमान काळात मानवाधिकारांचे रक्षण करणे आणि वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे ही संघटनेची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे प्रतिपादन मुख्य वक्त्यांनी केले. यासोबतच तळागाळातील नवीन कार्यकर्त्यांना संघटनेत जोडणे आणि संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.'यांची' लाभली प्रमुख उपस्थिती:ही बैठक यशस्वी करण्यासाठी आणि मानवतेचे कार्य पुढे नेण्यासाठी सोहेल रजा, अब्दुल अफ़ान, शेख इकराम, अयान मिर्झा, अशफाक शेख, दानिश सर आणि मलीक सर यांच्यासह संघटनेचे इतर मान्यवर पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांनी समाजसेवेच्या कार्यात पूर्ण निष्ठेने झोकून देण्याचा सामूहिक संकल्प केला. बैठकीच्या शेवटी आगामी काळात केल्या जाणाऱ्या सेवाकार्याची रूपरेषा सादर करण्यात आली. *मिडिया पोलिस टाईम अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*
Previous Post Next Post