दिनांक ११ मे २०२६ रोज सोमवार ला शिव सेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या हिंगणघाट नगर सेविका सौ. राजेश्री मनीष देवढे यांनी हिंगणघाट शहर चे नगराध्यक्षाला झाशी राणी चौक ते बस स्टॅन्ड चौक पर्यंत असलेला रहदारीच्या रस्त्या संदर्भात निवेदन दिले
.........................................
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
.........................................
निवेदनात म्हटले कि मागील २०२० मध्ये हा रस्ता ३५ लक्ष खर्च करून बनविण्यात आले. परंतु ज्या कंत्राटदारानी हे काम केले त्यांनी अतिशय निकृष्ठ दर्जाचे काम केल्यामुळे रस्ता जागोजागी खराब झाले आहे.त्याच प्रमाणे या रस्त्यावर अमृता योजनेच्या कामामुळे मोठया प्रमाणावर गड्डे पडले, काही ठिकाणी गिट्टी बाहेर निघाली. या रस्त्यावर नागरिकांना दोन चाकी, चार चाकी गाड्या चालवने अतिशय अवघड झाले आहे. या रस्त्याला लागून प्रभाग क्रं १५,१४,७,८आहे. या रस्त्याचा ८० टक्के भाग माझ्या प्रभागाशी निगडित आहे.त्याच प्रमाणे या रस्त्याने कोर्ट, तहसील कार्यालय, मंगल कार्यालय, मुलांचे शाळा, ट्युशन क्लासेस असल्यामुळे मुलांना, नागरिकांना जाण्या येण्यासाठी हा रस्ता अतीशय धोक्याचे झाले आहे. या रस्त्यावर रहदारी मोठया प्रमाणावर असल्यामुळे याला दुरुस्ती करून पुढे नवीन तयार करण्यात यावा जेणे करून हिंगणघाट शहरातील व ग्रामीण च्या लोकांना त्रास होणार नाही. या रस्त्यावर या पूर्वी शाळेकरी मुलांचे दुर्घटना झाले आहे.या रस्त्याचे ज्या कंत्राटदारानी काम केले त्याच्यावर सुध्दा कार्यवाही करण्यात यावी. यावर नगराध्यक्षा यांनी आश्वासन दिले कि रस्ता अतिशय खराब स्तिथीत आहे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याला दुरुस्ती करणे अतिशय गरजे चे आहे आणि पावसाळा पूर्वी या रस्त्या संदर्भात लवकरात लवकर नियोजन करून रस्ता तयार करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.
निवेदन देतांना हिंगणघाट नगर सेविका सौ. राजेश्री मनीष देवढे यांच्या सोबत हिंगणघाट तालुका समन्वयक शितल चौधरी, हिरामण आवारी उपस्तीत होते.

