बार्शीटाकळी येथे सोनबा पाणपोई उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात
अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीटाकळी तहसील कार्यालयासमोर “सोनबा पाणपोई” सुरू करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या या पाणपोईमुळे बाहेरगावाहून विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना थंड पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध झाली आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये तहानलेल्या प्रत्येक व्यक्तीला थंड पाण्याचा आधार मिळावा, या मानवतेच्या भावनेतून “सोनबा एक्वा”चे दहा पाण्याचे कॅन ठेवण्यात आले असून हा सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यकर्ते अमोल जामनिक यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे. “माणुसकी हाच खरा धर्म” या विचारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू आणि प्रवाशांची तहान भागत आहे.
या उपक्रमासाठी आमचे मार्गदर्शक तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
उद्घाटन प्रसंगी तालुका अध्यक्ष गौरसिंग भाऊ राठोड, तालुका सचिव अजय अरखराव, तालुका शहराध्यक्ष अझर पठाण, ज्येष्ठ नेते नईमुद्दीन भाई, गोबा सेठ विके पाटील, गोपाल चव्हाण, विशाल वानखडे, राजदीप वानखडे, दिनेश मानकर, जनार्दन गवई, दादाराव सुरडकर, अक्षय खरात, रक्षक जाधव, कळम साहेब तसेच नगरसेवक जफर आणि नगरसेवक मोहम्मद शाहजेब हे प्रमुख उपस्थित होते.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश जपण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तहानलेल्या लोकांना पाण्याचा घोट देताना समाजसेवेचा खरा आनंद मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नागरिकांकडून या उपक्रमाचे मनापासून कौतुक करण्यात येत असून, अशा सेवाभावी कार्यामुळे समाजात प्रेम, आपुलकी आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. *मिडिया पोलीस टाईम अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*

