यावल शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील नगरसेवकाच्या सत्ताधारी गटाला घरचा आहेर.
मीडिया पोलीस टाईम प्रतिनिधी. आरिफ खान.यावल
यावल शहरात प्रभाग क्रमांक तीन मध्ये सईद पुरा इस्लामपुरा या भाग आहे या भागात नेहमी अस्वच्छता राहत असल्यामुळे या भागातील नगरसेवक इमाम रझा खान यांनी स्वपक्षीय प्रशासनावर तोफ डागली आहे उद्या नगरसेवक यांच्या भावाचा लग्न असल्यामुळे त्यांनी नगरपालिकेतील स्वच्छता विभागाला फोन करून स्वच्छतेबाबत तक्रार केली असता त्या नगरसेवकाचे सुद्धा तक्रारीचे दखल घेतली गेली नाही म्हणून नगरसेवक इमाम रजा खान आक्रमक झाले आणि जर वार्डातील समस्या सुटत नसल्याने आम्हाला निवडून दिलेल्या जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे असा असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे जर प्रभाग क्रमांक तीन मधील समस्या सुटली नाही तर आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरू असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे

